गझल

गझल

पाहिले तुला हळूच

पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रूपमोगरा मनात दरवळे तुझा अजून
.

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून
.
आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
.
बघ वळून तू जरा तुझा पतंग लाजरा गं
लाव हास्यज्योत तू

नकार आहे

तुला न मी पाहिले तरीही मनात श्रद्धा अपार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!

तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा

कधीकाळी तुझ्यासाठी

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
तुझ्याचसंगे क्षण शेवटचा जावा, तू ये ना

माझ्या समोर दिसते आहे गर्दी ,पत्रांची...
पण आला नाही तुझाच सांगावा, तू ये ना

आठवते का जिथे चाललो होतो ,त्या दिवशी
त्या वाटेवर जरा विसावा घ्यावा.. ,तू ये ना

धरला होता हात तुझा मी रात्री

तारा असण्याचा भरला सारा सारा मी

तारा असण्याचा भरला सारा सारा मी
चमकू का थोडासा आता अंधारा मी?

सल्ले देतो... काहीही कामाचा नाही
आलो तेव्हापासुन आहे म्हातारा मी

अंशानेही वापरलेले नाही त्याला
खेचत बसतो हा मेंदूचा पेटारा मी

'हेतू आहे जगण्याचा' हे सांगत फिरणे
आवारा हा, आवारा तो, आवारा मी

माझ्या कर्तृत्वावर नसतो टिकलो येथे
लोकांच्या

पत्रे

शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे

आसवे उबदार पडली कागदावरती
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे

वाकडातिकडा नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

कशाला नाचते पोरी?

कशाला नाचते पोरी?
मला का जाचते पोरी ?

किती घायाळ मी व्हावे ;
किती तू हासते पोरी ..

तिथे कोजागिरी.आणि-
इथे आरासते पोरी ..

कधी हाती न ये पारा;
तशी तू भासते पोरी ..

समाजाच्या भल्यासाठी-
स्वत:ला तासते पोरी ..

नभाला रंग खोटे ते -
कशाला फासते पोरी ?

संकटे

'संकटे'

तू मला पाहू नको झुरतात आता संकटे.
वाट माझी अडवुनी बसतात आता संकटे.

संकटांना नाव नाही, गावचा पत्ता नसे;
वारसा शोधावया फिरतात आता संकटे.

दार केले बंद मी , पर्याय त्यांनी काढला;
कवड्सा कवटाळुनी शिरतात आता संकटे.

बाजरी , ज्वारी ,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता

जागलेली रात...

आसवांचे सूर ओल्या पापण्या गातात आता
माझिया डोळ्यात आहे जागलेली रात आता

चांदणे आलेच नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या शब्दात आता

कोणता कंदील लावू जिंकण्या काळोख येथे ?
काजळी होते दिव्याची पेटणारी वात आता

मोगरा नाही तुझा मी तू मला माळू नको ना
वादळे का मागशी तू

वळता वळता

टाळलेस तू मागे बघणे वळता वळता
ती नजरेची भेट राहिली घडता घडता

या मातीचा लळा असावा सूर्यालाही
हिरमुसला तो उदासवाणा ढळता ढळता

वेड विलक्षण बघ रात्रीचे काजव्यासही
नदीकिनारी सखी शोधतो जळता जळता

हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना
दिसली त्याला प्रिया असावी पळता पळता

या प्रेमाच्या अन प्रीतीच्या अनंत व्याख्या