गझल

गझल

''सावली''

प्रेमभावना न रोखली कधी मनात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

बांधला महाल मी तुला सुखात ठेवण्या
घर कधी करेन गे तुझ्याच काळजात मी?

साथ लाभता तुझी,कसे तरुण वाटते
केस पांढरे तरी अजून यौवनात मी

मीच येत राहिलो नि मीच जात राहिलो
तू न भेटलीस शोधले कणाकणात मी

ह्याहून मोठे अक्रीत काही घडणार नाही

गंधात दुनिया न्हाईल वा तो उरणार नाही
पर्वा फुलांना कोमेजलेल्या असणार नाही

माझी उजळणी भरपूर झाली असली तरीही
ईच्छीत उत्तर सहसा कधीही स्मरणार नाही

ठाऊक आहे वाटायचे सुख कैसे जगाला
कैसी करावी खात्री कुणाला खुपणार नाही?

घालून जाती सगळे मनाची समजूत माझ्या
खचतो तरी मी, ठरवून आता... खचणार नाही

आभाळ

अदृश्यच असतो क्रूस कधी



अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी

काही जखमा भरतात कुठे
खातात मुळासह ऊस कधी

मी तळमळतो, मी हरमळतो
ही कूस कधी, ती कूस कधी

आहेसच की माझ्यातच तू
अजिबात नको भेटूस कधी

फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी

इच्छा इतक्या सवती सगळ्या
संपेल बरे धुसफूस कधी

''वेदना''

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे

राखतो या चेहर्‍याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहताहे आसवांचा पूर आहे

काय लावू चाल मी या जीवनाला
जीवनाचे गीत तर बेसूर आहे

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

-डॉ.कैलास

हात होतो पुढे भिकार्‍यांचा

वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा

आज नसतील... काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्‍यांचा

राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्‍यांचा

शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्‍यांचा

एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्‍यांचा

एक साधा सजीव होता तो

जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते

गुलाबी गाव होते, ताटवे चौफेर होते
जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते

मला पाहून विरघळतेस हे माहीत आहे
तसे आतून होते का जसे बाहेर होते?

मला डोळे मिटावे लागले ही बोच नाही
कुठे आहेस तू हे शोधणारे हेर होते

तुझी गोडी, तुझ्या गोडीपुढे आला दुरावा
मला जे भेटले ते

जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी...

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी

अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी... झोपेत ती साकारतो मी शेवटी

फक्त मुद्देसूदही बोलून कोठे भागते?
लाच मौनाची जगाला चारतो मी शेवटी

फायदा उंचीमुळे झाला कुठे काही मला?
माणसांची

मी प्रेम दे म्हणालो...

मी प्रेम दे म्हणालो, 'देते' म्हणून गेली
जे जे मनात माझ्या, ते ते म्हणून गेली...

मी हे हृदय सखीच्या जेंव्हा पुढ्यात केले
ना बोलता खुणेने 'घेते' म्हणून गेली...

सुख-दु:ख वाटताना देऊन सौख्य मजला
सार्‍या व्यथा मला मी नेते म्हणून गेली...

त्यांना नसेल कळली प्रीती तिची नि माझी
ती चक्क माणसांना

मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

तुझी ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या..

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..
पडतात कवडसे..त्यांना पाहुन हसतो..

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो..

देतात दिलासे ऋतुही जाता जाता..
मी आता केवळ त्यांना पाहुन हसतो..

गर्दीत मिसळतो..गर्दी होऊन जातो..
चालतो..हासतो..जातो..येतो..बसतो..

तू वचने दे..आश्वासन.. आणा-भाका..
मी निमुटपणाने त्याच्यावर विश्वसतो..

शिषिरागम आहे 'बहर' कोठुनी यावा?
स्वप्नांची पाने गळती..वेचीत