मोडून यार गेला संसार आज माझा
माझ्या मिठीत रडला घरदार आज माझा..
स्वप्ने तिचीच सारी दिनरात रंगवीली
तो कुंचलाच झाला बेजार आज माझा..
ना थांब मी म्हणालो अन् थांबली न ती ही
नाहीच शब्द झाला लाचार आज माझा..
या ओंजळीत माझ्या फेकून चार काटे
केला असा फुलाने सत्कार आज माझा