गझल

गझल

बहरता बहरता.....

पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे

तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

पत्थरांशी हबा का खेळ मांडतो?
बावळ्याला कधी कळतील माणसे

कळले नाही

फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
कुणी, कुठे दडपला पुरावा, कळले नाही

अजाणता मी त्याच्या वाटा तुडवित गेले,
कसला चकवा, कसा भुलावा, कळले नाही

अनोळखी मी, मलाच

अंतरातली व्यथा अंतरी जपायची

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमध्ये आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा

हिशेबाची माय मेली?

हिशेबाची माय मेली?

कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?

पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?

तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?

किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?

कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?

म्हणालेत

जरासा त्रास होतो

कुणाचा भास होतो
जरासा त्रास होतो

तुझ्या रानात माझा
बरा वनवास होतो

जशी तू देव होते
तशी आरास होतो

रुपेरी पैंजणांचा
रुपेरी फास होतो

तुझ्याशी भांडतो पण
मलाही त्रास होतो

कुणाचे अन्न उष्टे,
कुणाचा घास होतो

जनांची चाकरी पण
मनाचा दास होतो

कशाला ’क्लास’ लावू?
तसा मी पास होतो

तुझा

कविता जुळून आली..

सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!

तेजाळल्या दिव्याच्या वातीस हे विचारा..
हे अग्निदिव्य करण्या, ती का जळून आली?

हा संपणार नाही रस्ता कधी व्यथेचा..
ती वाट का नव्याने येथे वळून आली?

जो काय कौल आहे, तो दे, 'असा', 'तसाही'..
पाहून वाट आता गात्रे गळून आली

कसा मी करावा खुलासा मनाचा...

कसा मी करावा खुलासा मनाचा
कुठे भरवसा आज आहे कुणाचा

भला हा जमाना भली माणसे ही
भला डाव आहे भुरळ पाडण्याचा

जरा लाभता मज इथे सौख्य साधे
जगा दु:ख आहे तया टाळल्याचा

जपा रोज तुम्ही इथे गारगोट्या
मला वेध आहे खर्या मानकाचा

तुला पाहताना असे वाटते की
मला लाभला चेहरा

भांडेल कोण आता?

मी कोण, कोण तू हे, मांडेल, कोण आता?
आयुष्य, नीटसे हे, वाचेल कोण आता?

केव्हांच जाहलो मी, प्रेमास पारखासा
बेधुंद मैफलींना, जागेल कोण आता?

तू दूर जावयाचा, निर्धार दाखवीशी,
मी स्तब्ध!, आपलेसे, वागेल कोण आता?

माझ्याच भावनांची, होळी कशी करू मी?
जाळीत जीव गेली....ऐकेल कोण आता?

अर्ध्यात छाटलेल्या, पंखांत जोर

वाटे पुन्हा पुन्हा..

रस्ता असा चुकावा वाटे पुन्हा पुन्हा..
मुक्काम हाच व्हावा.. वाटे पुन्हा पुन्हा!

चोरून भेटलो अन वचने किती दिली...
तो काळ आज यावा, वाटे पुन्हा पुन्हा..

सांगूनही जगाला, पटले कुठे इथे?
सोडून नाद द्यावा, वाटे पुन्हा पुन्हा!

मी चकवले व्यथेला, फसलीच खास ती!
काढेल पण सुगावा, वाटे पुन्हा पुन्हा!!

ईमान राखणारा

... भांडू नकोस राणी

पाहून पाठ इकडे फिरवू नकोस राणी
इतके महत्त्व कोणा देऊ नकोस राणी

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

तू कालच्याप्रमाणे नव्हतीस आजही अन
बाता तरी उद्याच्या मारू नकोस राणी

जमले न घालणेही फुंकर जरा मनावर
खपल्या तरी व्रणाच्या काढू नकोस राणी

जमले तुला न होते