बोलणे माझे निखार्यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे
भाग्य मिळवायास आहे फार सोपे
फक्त तिथला मार्ग काट्यातून आहे
घेतली आहे कुठे मी आजसुद्धा..?
ही नशा माझ्याच जगण्यातून आहे
भेट होते रोजची , पण प्रश्न उरतो...
आजही संवाद दारातून आहे
भय कुणाला वाटले इतके कधी ? जे -
आपल्या एकत्र येण्यातून