गझल

गझल

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही

भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही

काय मिळाले

श्वास

प्रेम व्हाले ओठ माझे चकवुनी
मोरपीशी स्पर्श झाले हरखुनी

नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी

शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी

मी विसरले भान माझे हुरळुनी
चित्र त्याचे गोड गेले तरळुनी

श्वास माझे सु़ख प्याले फसवुनी
स्वप्न माझे गुप्त झाले जवळुनी

स्वार्थ

वाटतो परमार्थ सध्या स्वार्थही
स्वार्थ वाटो शेवटी परमार्थही

एवढा खोटा कसा वागेल 'तो'....
ही निरर्थकता असावी सार्थही

तू निमित्ताएवढी गझलेमधे
अन निमित्ताएवढा शब्दार्थही

शिकवणीसाठी घडवले युद्ध ते
दिव्यदृष्टीच्याचसाठी पार्थही

आठ दशके स्वार्थ शिकणे चालुदे
एक घटका शिकवते नि:स्वार्थही

आपले निवृत्त झाले प्रेम पण
आठवांवर चालतो चरितार्थही

संपवावे एकदा व्यक्तीकरण
सापडावा

ईमान

वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...

नाही कुणीच येथे शब्दास जागणारे,
जगण्यासही अताशा वेठीस ठेवलेले...

नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,
दुनियेस वीर वाटे मैदान मारलेले...

जो तो इथे तमाशा पाही बघ्याप्रमाणे,
गमजा उगाच भारी सारेच गोठलेले...

सारे लिहून झाले जे जे लिहायचे ते,
शब्दास धार

मुद्दाम भुलवणारे

मुद्दाम भुलवणारे रस्ते बरेच होते
दारात सोडणारे चकवे बरेच होते

गावात पाहिली या 'माया' अजब निराळी
एकाच माणसाचे पुतळे बरेच होते

काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांना
क्रांतीत मागच्या ते जळले बरेच होते

टोपीत पांढर्‍या त्या लपणार ते कितीसे
आपादमस्तकी जे मळले बरेच होते

म्हणता कसे तुम्ही की 'मी पाहिलेच नाही'

बुद्ध बाटला आहे

एक आकांत चालला आहे
ज्यामधे बुद्ध बाटला आहे

काढले गायला जरा जीवन
काय आवाज लागला आहे

आज भेटून पाहुयात पुन्हा
आजचा दिवस चांगला आहे

ओळ मेंदीस रंगवे माझी
शेर हातास लागला आहे

झोपडी बंगल्याहुनी मोठी
'गोल' संपूर्ण आपला आहे

शेकले मी मनास विरहाने
गारठा फार वाढला आहे

तेल वांग्यावरी वड्याचे

अनोळखी होऊन जगावे....

अनोळखी होऊन जगावे... असे वाटते
स्वत:स विसरुन वेडे व्हावे, असे वाटते

गीत तुझे, ओठावर येणे शक्यच नाही
हृदयामध्ये... निवांत गावे असे वाटते

तुला स्वत:ची ओळख अजुनी पटली नाही
हेच तुला मी समजुन द्यावे... असे वाटते

एकटेपणी निरखुन घे तू स्वत:स आता
तुला 'तुझे' प्रतिबिंब दिसावे, असे वाटते

तुझ्या अंतरी दडलेल्या

रिती पोकळी

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची

कुठे कालच्या उन्मादाचा कैफ

शोध ज्याचा घेतला तो..(अनुवाद) : केदार पाटणकर

खूप दिवसांपासून एखाद्या उर्दू गझलेचा अनुवाद करावा, असे घोळत होते. 'हवी तशी' गझल मिळत नव्हती. 'जुस्तजू...' बाबत तो योग जुळून आला. आतापर्यंत इंग्रजीतून मराठीत गद्याचे अनुवाद केले आहेत. उर्दूतून मराठी हा पहिलाच प्रयत्न आहे. आनंद, अस्वस्थता, समाधान....अनुवाद करताना निर्माण झालेल्या या सुपरिचित भावनांचे संमेलन अजूनही मनात आहे. उत्तमतेला नेहमीच वाव

भग्न : मधुघट

विदूराच्या कुटीमध्ये सुखाने जेवला होता!
गडी होऊन नाथांच्या घरी तो राबला होता!

अता ह्या भग्न गाभार्‍यात नाही एकही मूर्ती
कुणाचा शाप येथे देवतांना भोवला होता?

तुझ्या ह्या चार शब्दांनी सखे मी मोकळा झालो!
जरासा गाळ माझ्याही तळाशी साठला होता!

सुगंधाचे हवेला हेलकावे कोठुनी मिळती?
तुझा संभार केसांचा कधी गे मोकळा