गझल

गझल

पतंग


पुन्हा अता मी झुरतो आहे
कणाकणाने सरतो आहे


नशीब मोठे दर्पणाचे त्या
बघून ते मी जळतो आहे


तुला कसे मी समजावू गं?
तुलाच आता पुसतो आहे


मनास का आज भिती वाटे
तुझा खुलासा कळतो आहे


..नि प्राण घेऊन पतंगाचा
दिवा 'बिचारा' जळतो आहे!


अभ्यास

आता मला गवसला आभास आसवांचा
दडपून ठेविला मी जो श्वास आसवांचा

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा

रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा

पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा

एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला

जरासा...


ताठला होता जरासा...
मोडतो रस्ता जरासा...


ओळखे तेंव्हा मला मी
विसरलो आता जरासा...


चिघळती भेगा मनाच्या
वाफसा येता जरासा...


थांबते चर्चा अशी का?
मी तिथे जाता जरासा...


पिंजराही मित्र होतो?
बोलतो तोता जरासा...


तोच आहे तीरकमठा
हा नवा भाता जरासा...


लोकशाही धन्य झाली
लाजतो नेता जरासा...


 


वखत वेळ


वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ कसला गुंगती माणसे

तो जरी हारला, मी जरी जिंकलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?

तीच ती भांडणे,त्याच त्या कारणे
बदलते शस्त्र, ना बदलती माणसे

आवई प्रलयाची उठविते कुणी
सावली सोडुनी धावती माणसे

दूर असता किती मखमली भासती
जवळ जाताच पण टोचती माणसे

लावती

ओल

मनी काय होते, जनी काय केले?
तुम्ही येउनी या जगी काय केले?

तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले

मला वेगळा काय पर्याय होता?
तरी वाटते - हाय मी काय केले!

पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"

मला श्रेय मिळते

वायदे बाजार

पाहण्याला लोक सारे लोटले
रान शब्दांनी कसे हे पेटले

रोज ठिगळे सांग लावावी किती
रोज हे आभाळ असते फाटले

ह्या सुखाला आज टाळावे कसे
पाहिजे तेव्हा न होते  भेटले

का अशाने देव कोणा पावला
पाय दगडाचे कशाला चाटले

पाळले होते मनाने सोवळे
काल नजरेने तुझ्या ते बाटले

पिंजर्‍यावर प्रेम माझे येव्हढे
पंख ही माझे

कुठे म्हणालो परी असावी




कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी

हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी

तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी

नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी

- प्रणव सदाशिव काळे

एकटाच मी !

नाही कुणीच आसपास...एकटाच मी !
वाटे किती किती उदास...एकटाच मी !

मागे-पुढे कुणी न सोबतीसही कुणी...
माझा सुना सुना प्रवास...एकटाच मी !

माझी कुठेतरी असेल सावली इथे...
शोधा, करा करा तपास...एकटाच मी !!

माझ्या मनात बाग एक रोज बहरते...
हे माळरान...अन् भकास एकटाच मी  !

माझ्याच आठवांत दंग दंग मी

सुतक

रोज ओवी कोण गाते?
नित्य दळते धूळ जाते

आसवांच्या मुद्दलीचे
मी उघडतो रोज खाते

काजव्यांनी रात्र जळते
अन दवावाचून पाते

थोर बाणांची उधारी!
घेतले उसनेच भाते

संशयाचे विष नसावे
तू हवे तर तोड नाते

मृगजळाचे व्यसन सोपे
सत्य अवघड,लाच खाते

उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?

 

 

एकदा आहे तुला भेटायचे

एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे

दूर असताना मला छळतात हे
नाव भासांचे तुला सांगायचे

हे पहाटेच्या दवाला सांग तू
आज स्पर्शाने तुझ्या उमलायचे

बासरीचे सूर तू छेडू नको
थांबणे माझे पुन्हा लांबायचे

कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही
पाश शब्दांचे कसे उधळायचे

दोन घटकेचीच होती साथ ती
का