गझल

गझल

वजाबाक्या

हरवलेल्या सावल्यांना शोधतो
मी पुन्हा जखमा जुन्या त्या मागतो

आठवांच्या आज ही आल्या सरी
कोण डोळ्यातून माझ्या वाहतो?

ह्या दिशा दाही मला बोलावती
मी परी देहात माझ्या गुंततो

खेळ प्रेमाचा जरासा वेगळा
जिंकण्या साठी स्वतःला हारतो

चांदण्याशी काय बोलू रोज मी?
मग कशासाठी असा मी जागतो

ही कशी हातास मेंदी

व्यर्थ

इथे जीवनाचे दिवाणे हजारो
अधाशी मनाचे बहाणे हजारो

कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो

तुझे ओठ पोरी किती लाल झाले!
कधी चुंबिले तू उखाणे हजारो?

पुन्हा हात माझाच धरलास का तू?
मला लोक पुसती घराणे हजारो

उगा माणसांची नको खूण शोधू
गवसतील पत्थर पुराणे हजारो

जरी हुंदक्यांनी

इतके धुळकट रस्ते इथले....

इतके धुळकट रस्ते इथले
रक्ताचेही डाग न दिसले

तुझे  स्मीत सांगते मला की
तुलाच माझे  गूढ उमगले

पानगळीच्या पानांवरती
आठवणींचे  ऊन उतरले

मेघ रिकामे ,  गुमसुम वारा
देवच जाणे  काय  बिनसले

विचार करतो आहे आता
हातामधुनी काय निसटले

विझता विझता उठल्या ज्वाळा
आणिक मग तू डोळे मिटले.......

***

 

नाते

सारे बिघडल्यासारखे !
मोडून पडल्यासारखे !

ओठांवरी येई हसू - 
आतून ऱडल्यासारखे !

दाही दिशा म्हणतात या -
`झाले जखडल्यासारखे !!`

सोडू नको गाणे़, जरी -
जगणे भरडल्यासारखे !

बघणे तुझे माझ्याकडे
चोरी पकडल्यासाऱखे !

का वाटले वळणावरी 
पाऊल अडल्यासारखे !

आयुष्य संपू लागले...
वाया दवडल्यासारखे !

बरसायच्या आधीच का 
वाटे

रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते

रात्री जे घडते त्याची दिवसाला वार्ता नसते
पण पान बिचारे का हे दवबिंदू मोजत बसते?

वरवर आताशा मीही खुश असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही खोटे हसते

ती समोर असते तेव्हा आकाश निरभ्रच असते
ती दूर जराशी होते अन हे घनघोर बरसते

ते कसे भेटणे? तो तर -लाटांचा केवळ तांडा

गझल

का, कधी, कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले

भाबड्या डोळ्यांत अंजन होउनी निर्घृणपणे
अनुभवांचे झोंबरे शिरकाव होते पाहिले

ते बरे होते विरोधक उघड ज्यांची दुष्मनी
मी स्वकीयांचे छुपे अटकाव होते पाहिले

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

निवडताना फूल नाही

वामवेद

जो ध्रुव तो ढकलला मांडीवरून जातो
प्रत्येक मार्ग माझा वेदीवरून जातो

लपवून ठेवतो मी ते बोल अंतरीचे
(तांडा किती कवींचा वेशीवरून जातो)

शिंपीत राहतो मी निर्माल्य वाळलेले
तो ढीग पाकळ्यांच्या ओलीवरून जातो

नाहीच छापलेला पोथीत पंडितांच्या
'मम-वामवेद' त्यांच्या डोईवरून जातो

वाघावरून येती मज भेटण्यास त्यांना
आलिंगण्यास मीही भिंतीवरून जातो

गझल





सगळे काही पूर्वनियोजित , आपण नव्हतो
या व्यवहारामधे निमंत्रित  , आपण नव्हतो


संदेहाच्या परिघांवरती जगलो  आपण
म्हणावयाला कपोल कल्पित आपण नव्हतो

जेंव्हा केंव्हा भरून आले , रडते झालो
कुणी महात्मे अथवा प्रेषित आपण नव्हतो

दुनियेच्या दोषांवर देखिल प्रेमच केले
डाग मोजण्याइतके  शुचित आपण नव्हतो


वसंत कोठे निघून गेला , कळले नाही
कळावयाला तेंव्हा शुध्दित आपण नव्हतो

अनंत ढवळे





अजिंक्य!

मेघावरी उडण्यास उत्तुंग झेप घेतली,
मग नभातरे ममपंख कापविले कोणी?

वाटेवरी धावण्यास सुसज्ज पावले झाली,
मग पायातरे दोरखंड बांधविले कोणी?

प्रेमासी सांगण्यास ह्रदय हाती काढले,
मग रक्तातरे दगड उडविले कोणी?

नजरेसी मिळण्यास कटाक्ष पुन्हा धजले,
मग चक्षुंतरे तेजाब फेकविले कोणी?

तुझ्यांतरी जगण्यास मृत्यूस आज जिंकले,
मग भाग्यातरे यमासी धाडविले कोणी?

-निलेश

बुरखा

कशास थोडे मोजुन मापुन
खुशाल द्यावे स्वतःस झोकुन

मनोवनातिल हिरवळ सारी
पातेपाते जावी पेटुन

प्रभा नसावी तमास या अन
प्रकाश जावा अंधःकारुन

नको किनारा जीवनास या
वहात जावे समिंदरातुन

लहालहा या शुष्क जिभेतुन
सारी थुंकी जावी आटुन

अशांत आतिल उधाणास त्या
निवांत जागी द्यावे ओकुन

कणाकणाने केले गोळा
पशापशाने द्यावे