लोचट आशा, नेक निराशा, एक उसासा, जीवन
ही अभिलाषा, ती अभिलाषा, हाच दिलासा जीवन
वाट जशी मी काढत होतो मुक्त, मनस्वी होण्या
त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीवन
एक नको ती लाट म्हणाली 'ये चल माझ्यासोबत'
सागरकाठी तडफडणारा व्याकुळ मासा .... जीवन
'जन्म कुठे अन अंत कधी' हातातच नाही