गझल

गझल

विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो,
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा
तुलाच करते नवस विठू

तुझ्या दयेचे अमृत दे,
जळते माझी तुळस विठू

घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

गलका !

गलका !

धक्का बसला कसा कळेना, एक उडाला टवका !
आज पाहिले... रंगाखाली देव किती हा मळका !

सजावटींच्या दिव्यांपुढे ही शांत विलसते समई...
असो कितीही लखलखाट अन् असो कितीही भपका !

उगीच का डोळ्यांत अचानक पाणी दोघांच्याही ?
त्याच क्षणी मज लागे उचकी, तुला ज्या क्षणी ठसका !

तसा

जायचे आहे कुठे पण?

आणले भानावरी खालावलेल्या प्रकृतीने
चालली होतीस केव्हाचीच तू माझ्या गतीने

उभयपक्षी कलम प्रस्तावात आले, मान्य झाले
'पाळुया याच्यापुढे कंत्राट दंडाच्या भितीने'

"आजही आहे तुला संधी कुणाचे व्हावयाची"
मी कुठे दिसलो तुला तर सांग हे माझ्यावतीने

कोण कोणाच्यामुळे या राहणीमानात आहे...
स्पष्ट झाले केवढे त्या एवढ्याश्या पावतीने

आज मागे पाहिले की

असाच कधी

असाच कधी बसलो होतो आसव गाळीत मी
विरहात तुझ्य प्रिये होतो एकान्त जाळीत मी

कळे न मज कसे असावे जिवन तुज वाचुनि
वाळू मध्ये स्वप्नान्चे होत चित्र ऊतारीत मी

वाहुन गेले चित्र जरी राहिलो मी बाकी
काळच्या लाटे सोबत का नव्हतो धावीत मी

असेन ही मी खुळा कदाचित समजून ही

फुलानां स्वप्नात ही काटे बोचले .....

गझल :

फुलानां स्वप्नात ही काटे बोचले
तरी त्यानी हाल हे सारे सोसले....१.

कधी त्यानां बुलबुलानी सोबत दिली
तसे फांसे पारधी का हे पोचले ?....२.

जरासा हा गार वारा आला वनीं
निखारे घेऊन का सारे पोचले ?....३.

कसे आले आज माझे सारे सखे ?
निरोपाच्या ही बघा आधी पोचले !....४

ह्या कशा उबदार ओळी...

ह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?"
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा !

एक कडवे प्रेयसीला, एक

शिक्षा

शिक्षा नवी तरीही आरोप जुना आहे
काही न बोलणे हा, इतकाच गुन्हा आहे

आम्ही असे अनोख्या मस्तीत झिंगलेले,
गेले घडून त्याचे सुखदु:ख कुणा आहे ?

घायाळ जरी झाले झेलून शर विषारी,
हे पाखरू भरारी घेणार पुन्हा आहे

गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

ही

आता माझी एक ओळही मलाच भावत नाही

विकास आहे की अधोगती काही समजत नाही
आता माझी एक ओळही मलाच भावत नाही

तेजाच्या दिसताच खुणा धावून गाठणे उरले
आज उगवता सूर्य स्वतःची दिशाच कळवत नाही

गेलेला क्षण पाहुन वाटे उगाच घाबरलो की
येणारा क्षण पाहुन वाटे काही धडगत नाही

दिली आत्मविश्वासाला मी तिलांजली त्राग्याने
मग जे जमले ते

बहरली मनाची कधी बाग साधी ?

बहरली मनाची कधी बाग साधी ?
न आली तरीही मला जाग साधी !

कश्याला फुलांना अश्या खोल ज़ख्मा ?
न माळ्यास आली तरी जाग साधी !

कधी कंटकानी दिले दंश ओले
कधी पावसाने दिली आग साधी

कधी बुलबुलांनी , कधी ह्या हवेने
दिली खूप प्रेमा मुळे आग साधी

मनाची `

असे पाण्यामुळे गंगा

अशी मी धबधब्याखाली कधीची नाहते आहे...
जिथे माझ्याच अश्रूंची नदीही वाहते आहे ..!

असे पाण्यामुळे गंगा, नसे गंगेमुळे पाणी;
तसे मरणामुळे जगणे भरूनी वाहते आहे ..!

हव्या शीतल खुणा सार्‍या जगाला तप्त सूर्याच्या..
तशा देऊन मीही चन्द्र बनुनी दाहते आहे ..!

अमावास्या असो वा पौर्णिमा, नसतो फरक काही;
रवीचे येत