गझल

गझल

तुझ्यानंतर


चालली ही माणसे सारी कुठे?
संपते ही वाट अंधारी कुठे?

कोण जो, नाही जुगारी जाहला?
माहिती कोणास, व्यापारी कुठे?

वाटतो मी दुःख पाण्यासारखे
पाहिली आहेच बेकारी कुठे?

दर्शनाची रांग येथे पोचली
जायचे होते तुझ्या दारी कुठे?

लक्ष्य आवाक्यात जेव्हा भासते
राहतो तेव्हा धनुर्धारी कुठे?


चित्रगुप्ता धाड माघारी मला
दुष्मनी झाली कुठे... यारी कुठे

मी तुझ्यानंतर उरावे ईश्वरा
एवढा आहेस तू भारी कुठे?

नारद

नारदाचे चालले वाल्यापुढे
राम नाही जिंकला धोब्यापुढे

चांगले झाले कधी की वाटते
काय आहे व्हायचे याच्यापुढे?

मी दिले सोडून आताशा मला
व्यर्थ आहे बोलणे माझ्यापुढे

पाहिजे तेव्हा मला घेऊन जा
काय आहे पाहुया त्याच्यापुढे

भेट झाली आपली कोठेतरी
वागले खोटे खरे खोट्यापुढे

नीतिमत्ता या जगाची लोपते
रेशमी नाजूकशा धाग्यापुढे

प्रश्न होता काल, आहे आजही
'व्हायचे तारा कसे' तार्‍यापुढे...




वेगासवे मनाच्या, मी धावणार आहे



वेगासवे  मनाच्या,  मी  धावणार  आहे
थोडे  करून  हेही,  मी  पाहणार  आहे.

हा  सूर  ताल  झाला,  या  अंगणात  माझ्या
ते  वाकडे  असेना,  मी  नाचणार  आहे.

ना  आस  आसवांची,  आता  मला  हवीशी
गंगाच  आटली  ती,  ना  वाहणार  आहे.

वांध्यात  जीव  थोडा,  जो  सैरभैर  झाला
श्वासात  घेत  त्याला,  मी  बाहणार  आहे.

तो  ध्रूव 

वादळे उसळून आल्यावर....


एवढे होऊनही म्हणते,
चांगल्यासाठीच हे घडते

येऊनी समजावतो जो तो
'सोड, जाऊ दे, असे घडते'

सर्व नेतो दूर जाणारा
...सावलीही रे कुठे उरते ?

प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ?

वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते !


घार


मारले घारीस काही पारव्यांनी
'पिंजर्‍यामध्ये सिकंदरश्या' थव्यांनी

वर्ण केले चार जेव्हा आपल्यांचे
शोधला त्यांचा मनू मग पाचव्यांनी

आपला पत्ताच सूर्याला मिळेना
काढली आकाशगंगा काजव्यांनी

ओढतो आहेस त्यांची वात सध्या
साजरी झाली दिवाळी ज्या दिव्यांनी

काढली कोणी जरा शोधून काढा
वाट जी चोखाळली आहे नव्यांनी


अलिप्त


का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?

पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

रुतणा-या कंटकवाटा, जखमी

ओळख

ओळख

---------------------------------------------------------

दिसलो मी  जगाला तरी कळलोच नाही,

फुलवून फुलबाग मी मला फळलोच नाही...//१//

 

आंधळ्या न्यायात वाटले या जगी चैतन्य मी,

आंधळ्या दॄष्टीस त्याच्या मी कधी पडलोच नाही...//२//

 

द्युतात जीवनाच्या नाडलेला धर्म मी,

हाय्..तरी मॄत्युशी पैज मी हरलोच नाही...//३//

 

वाहून व्यर्थ क्षीणलो माझ्या वेदनांची दप्तरे,

प्राक्तनाच्या पाठीवरती  कधी रुळलोच नाही...//४//

 

पुन्हा पुन्हा ते तसेच होते


मनातले या मनात ठेवू, ठरून काही बरेच होते
पुन्हा पुन्हा सावरून घेतो, पुन्हा पुन्हा ते तसेच होते

मनास नाही इलाज काही, उगाच हेवा, उगाच जिद्दी
जरा कुठे गाडले जुने की लगेच काही नवेच होते

कुणाकुणाला दुखावले मी अमोज यादी प्रसार पावे
जिथे जिथे वाट काढली मी, समोर कोणी उभेच होते

आजही

काही विशिष्ट कारणाने १६ फेब्रुवारीनंतर पुन्हा येथे गझल लेखन सुरू करत आहे.



----------------------------------------------------------------------



शेवटी ओळीत आशय हेलकावे आजही

फेकलेल्या कागदांचा ढीग लागे आजही


माहिती होते तुला हे माहिती होते मला

'मीच का बोलायचे' हा पेच आहे आजही


कोण होतो, कोण जाणे काय मी केले तिथे?

ठेवले आहे घरावर नाव माझे आजही


योजना माझ्यातुझ्या आता कशा रेखायच्या?

काल मी होतो जिथे

उदास...!

.........................................
उदास...!
.........................................

तशी अता राहिली कशाची न आस काही !
जगायला दे तुझे मला फक्त भास काही !

विचारतो मी कधी कधी पारिजातकाला....
`उधार देशील का तुझे मंद श्वास काही ? `

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !

अजून ही एवढीच