गझल

गझल

आज उद्या


आज जे जे येणार आहे
ते ते उद्या जाणार आहे

मित्र शत्रु  जमले दारी
काय मी मरणार आहे

जे वसंती प़क्षीहीन
झाड ते मरणार आहे

जगणे सुखाचे क्षणीक
दु:ख ना सरणार आहे

का नेहमी जय रुपाचा?
प्रेम का हरणार आहे?

आयुष्याची हीच अखेर
राख जी उरणार आहे

अजूनही

ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?

जागल्या कळ्या; सुकून चालल्या,
गंध मात्र राहिला अजूनही

ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही

लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही

सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही

मीच जिंकले तरी हरायचा
डाव

मन्मना...!

कधी जाणता.. अजाणता तुलाच होती यातना,

मन्मना..मन्मना,समजून घे रे जीवना...//ध्रु//

 

चेहर्‍यांच्या सागरात मन चेहरा तोच शोधीते,

निष्पाप एका चेहर्‍यावर सर्वस्व वेडे जुंपीते...

पट तोच डाव नवा प्राक्तनाशी सामना...//१//

 

स्मरती अनेक वचने दिली ओल्या पापण्यांनी,

सारून काटे मागे वार केले पाकळ्यांनी...

जखमा पुन्हा नव्याने साद देती या मना.....//२//

 

वेदना

लक्षातल्या निमिषान्तही , द्रुश्यान्तही तव चेतना

अवघड्ल्या हास्यात माझ्या, चमकून जाई वेदना...//ध्रु//

जन्मल्या हळव्या क्षणांना कैद ना केले कुणी,

सांगतो सारे मनीचे चेहरा नच धोरणी..

इछ्छिले सगळे मिळावे वेड्या अशी जनरित ना....//१//

आसवेल्हाळ मोर मनात मुक्त नाचतो,

अजुनि डोळ्यान्त रुक्ष नवे गीत वाचतो..

गालांवरती ओघळणारे आज शब्द वाच ना....//२//

गंधिले अनेकदा

धुळीतला ध्रुवतारा...!

..........................................
धुळीतला ध्रुवतारा...
..........................................

मी अलगद कोठे कधी झेलला गेलो ?
आदळलो, फुटलो, किती ठेचला गेलो !

मी सुखात होतो मागे, पडद्यामागे...
मी पुढे, तरीही पुढे, रेटला गेलो !

केली न कुणाच्या घरात मी घुसखोरी...
मी रस्त्यावरती कसा खेचला गेलो ?

मी आलो नाही जगात आपखुशीने...
हाणली कुणीशी लाथ; फेकला

धागे

माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना, तुला हे कळले कधीच नव्हते

येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते

मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते

दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते

मला माझ्या गुन्ह्याची फार मोठी स ज़ा झाली ....

५.

मला  माझ्या गुन्ह्याची  फार मोठी  स ज़ा  झाली
जरा  प्रेमात मी  पडलो, जिवाची  मजा झाली....१.

न  खाणे  आवडे  माला, न  पीणे  व्यथा  झाली
जगाला  ह्या  फुकटची, मौज आणी मजा झाली....२. 

फुलांचे  मी  निसासे  आज सारे बघू  शकतो
ख़ुदाची  हि  बघा माझ्या  जिवा वर  क्रुपा झाली....३.

तुम्ही  माला  नका  पाहू 

वेदना


आनंद  पार  त्यावरी , ती  का  बसावी  वेदना
येऊन  त्या  सुखासवे, ही  का  हसावी  वेदना.

दु:खात  मी  जुन्याच  रे, देतो  तिला  पत्ते  नवे
का  वाटते  मला  असे, त्यांना  फसावी  वेदना.

योगीच  हा  मनातला,  की  भाव  ऐसे  सांगतो
वैर्‍यासही  अशी  कधी , ही  ना  डसावी  वेदना.

ह्या सोसण्यात  टोच  का,  हा  वार  वर्मी  लागतो

प्रवास


संपला प्रवास जरी, साथ सोडू नको
गाठले मुक्काम तरी, वाट मोडू नको

देव जिथे दगडांचे, माणसे असतील कशी
याचनेसाठीही कधी , हाथ जोडू नको

सत्य वेड्या रुचले कुणा, का उगा दाविशी
दोष ना त्यांचा जराही, आरसे फोडू नको

जे जसे होणार होते, ते तसे होणार आहे
प्राक्तनांचे लेख आपुले, तू उगा

आश्चर्य काय ती ही आनंदली असावी


आश्चर्य काय ती ही आनंदली असावी
माझ्या कलेवराची ती सावली असावी

आघात लेखणीचा कमजोर का पडावा?
छापून आसवांना ती गंजली असावी

दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी

माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी

जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी