गझल

गझल

जाग


झोपले ब्रह्मांड सारे, चांदण्यांना जाग आली
दाटला अंधार आता, सावल्यांना जाग आली

जागुनी हा जन्म सारा पाहिली मी वाट ज्याची,
भंगले ते स्वप्न वेडे, पापण्यांना जाग आली

सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या?
रातराणीच्या सुगंधी पाकळ्यांना जाग आली

गर्द काळोखात झाले रान जागे, या मशाली -----
पेटल्या येथे कुणाच्या? काजव्यांना

गजल

जीवनाच्या गाभार्‍यात,
सुर वाजती भक्तीचे,
मन्द तेवणे समईचे,
दरवळ्णे अगरबत्तीचे,
वास्तव्य लक्श्मीचे.
जीवनाच्या परिसरात,
व्रुन्दावन उभे तुळ्शीचे,
डेरेदार गुच्छ फुलान्चे,
ट्पोरे थेम्ब दवान्चे,
जीवनाच्या वाटेवर,
रेशमी शब्दान्चे गालीचे,
पान्ढरे शुभ्र शिम्पण प्राजक्ताचे,
सुगन्धी फवारे अत्तराचे.
जीवनाच्या गाण्यात ,
शब्द-सुरान्चा मिलाप,
सुख-दुखान्चा  आलाप,
सन्गीताचा सुरेल साज,
तृप्त होती कान आज.

गझल : रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः संपादित

रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः  संपादित

१.

रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले
अंतराच्या हुंदक्याने शल्य माझे पाहिले....१.

जे कधी माझे न होते,स्वप्न ते मी पाहिले
काळजाच्या चिंधड्या नी रक्त माझे पाहिले....२.

ईश्वराची हि असावी अल्प कि मोठी क्रुपा
ह्या जगी मी भांडताना मित्र माझे पाहिले....३

ग झ ल : रात्र थोडी गार होती .....

५.

रात्र  थोडी  गार होती , नी  तुझा सहवास पण
मैकद्याचा  कैफ  होता,मोगरयाचा  वास  पण ....१.

तो अबोला जाळणारा,नी  तुझी  कातिल  नजर
बांगड्यांच्या  लय  ध्वनि  वर  चालणारे  श्वास  पण....२.

मी  न माझा राहिलो  नी , तू  न  तुझ्या  बंधनी
ईश्वराचा  भास  देई ,  ते  गुलाबी   भास  पण....३.

केतकीचे  हे  जणू 

ग झ ल : तू कधी स्वप्नात माझ्या येशील का ? .....

३.

तू कधी  स्वप्नात माझ्या येशील का ?
काळजाच्या  आर्त भेटी घेशील का....१.

रात्र सारी जी  व्यथा मी  सांगोपतो
तू कधी  ती  मेजबानी  घेशील  का ....२.

फुल  हे  मी  आसवानी  जोपासले
ठाव  सारया  उपवनाचा  घेशील  का....३.

तू  शरानी  काळजाचा घेऊ नको
नेम हसर्या नेत्र युग्मी  घेशील  का....४.

जी ` खलिश

तु जाता


तु जाता सोडिले सुखांनी
केले जवळ दु:खांनी

एकांऽत छ्ळे त्यात
सूर छेडिले कोकिळांनी

होते नशिब उफराटे
जखमा दिल्या स्वजनांनी

राहिले आता ना गूपित
घात केला आसवांनी

फुलती गुलाब हजारो
सखे तुझ्या आठवांनी

गझल : हात माझ्या काळ्जाला लावू नको.....

२.
हात माझ्या काळ्जाला लावू नको
हे बहाणे छेडण्याचे काढू नको....१.
  मी बरा  आहे, बरा राहू दे मला
  औषधे ही व्यर्थ सारी लावू नको....२.
ह्या चमनची ही पुराणी आहे प्रथा
बुलबुलानां आस वेडी लावू नको....३.
   तू नको शर त्या कमानी खेचू असा
   गुदगुल्या होतात अंगी खेळू

तु


चांदण्याचा भास तु
दैवि एक आभास तु

भार दवबिंदुसहि
पाकळ्यांचा श्वास तु

नागापरि वेडावलो
चंदनि निश्वास तु

गंधावले आयुष्य
मोगरि सहवास तु

अर्पितो स्वत:स मि
आंधळा विश्वास तु

धन्य मि खेळुन झालो
श्रिरंगाचि रास तु

आज का?


आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही?
आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही?

शब्द झाले मूक; जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा
मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही?

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही

निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू,
भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही

अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..

======================

अढी  कपाळावरील  जेव्हा  मनात  गेली..
कडू  विषाची  कुपी  जणू  जीवनात  गेली

अता  समजली  मला  सुखाची  प्रमाणव्याख्या,
अता  समजले- कितीक  वर्षे  भ्रमात  गेली..

तुझा  दुरावा  भरून  आहे  क्षणात  सार्‍या..
निदान  आता  विवंचनांची  ददात  गेली !

"यदा-यदा.."चा  कधीच  नाही  दिलास  प्रत्यय,
किती  युगे  आमची  तुला  पाहण्यात  गेली !

कडे- कपारी मधून