गझल

गझल

मोगरा


सुकलि मोगर्‍याचि फुले तु माळ्लेलि
तुटलि वचनेहि दिलि घेतलेलि

हातात हात होते,ओठांत ओठ होते
जवळिक  जैसि कळि न उमललेलि

होते सुगंधि श्वास, सहवास भारलेले
आता फुले जणु कि देठांत खुडलेलि

नाजुक बोल होते दवबिंदुपरि तुझे ते
झालि विखारि वाणि मधांत मुरलेलि

मधुचंद्र तु सुखाचा, तु चांदणे रुपाचे
आता जिवनि रात अंधारलेलि

एकांत माझा


हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.

नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू

...पेटारा !


...................................
...पेटारा !
...................................

चार किरणांच्या गजांचा घेतला थारा कधी मी ?
बेइमानी तुजसवे केली न अंधारा कधी मी !

मी रहस्ये घेतली जाणून साऱयांचीच सारी....
शेवटी कळणार का माझा मला सारा कधी मी ?

मी धुळीच्याही कणाला मानतो पृथ्वीप्रमाणे...
उंच आकाशातला होईन का तारा कधी मी ?

वेगळे गाणे

उभा ज् न्म गेला


उभा जन्म गेला जगने शिकाया
विसरुन गेलो त्यात जगाया

मृगाक्षि तुझे प्रेमहि मृगजळाचे
फसल्यावरि लागले हे कळाया

नसे मालमत्ता देव इतकेच म्हटले
पाखंडी मज लागले जग म्हणाया

उगा हसण्यावारि आयुष्य नेले
आता रोज रडतो एकदाच हसाया

कसे उलटे पडले नशिबाचे फासे
न खेळता लागलो मि हराया

पुढे काय घडणार ठाऊक नव्हते
तरि मारल्या रोज कैक बढाया

असत॑ ना कोनि कोनाचे


असते इथे ना कुनि हि कुनाचे
आयुषय गाने मिलनाचे विरहाचे

थटटा कशि जिवघेनि नशिबाचि
ओठि न थेम्ब , मेघ नयनि आसवान्चे

माझ्या तिच्यात भेद इतकाच होता
मि स्वप्नवेडा , जग तिचे वास्तवाचे

हरवुन बसलो स्वताला तळहाति
गवसले तरिना दार माझ्या नशिबाचे

जखमा नसे क्षुद्र या ह्रदयाच्या
आहेत हे तर धडे जिवनाचे

भेट

सारे तुझ्यात आहे

माझी ही गझल माझ्या "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधली आहे.  अभिजीत राणे ह्यांचं संगीत दिग्दर्शन आणि स्वप्निल बांदोडकरांचा आवाज. ही गझल इथे ऐकता येईल.

http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe

आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव

आकांत

प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता

यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता

तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?

सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता

सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता

वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?

रात आहे

हाय वेडी चांदणी ती माझिया ओठात आहे
लाघवी ही लाजणारी , प्रणयाची रात आहे...

प्रेम माझे त्या कळीला सांजवेळी सांगताना
भैरवीही आज येथे मारवा तो गात आहे

रोज रात्री आठवांत तुझ्या , अश्रूंशी बोलतो मी
अंतराचा भास हा पण अंतराची साथ आहे

शायराची शायरी तू , या मनाची मेनका तू

निघाल्या गवळणी पाण्याला....

निघाल्या गवळणी पाण्याला,
कशी खबर गेली कान्ह्याला?
 
जरा ओढणी घ्यावी चटकन,
कुणी सांगता का वार्‍याला?
 
मना थांब! अजुन कळत नाही,
धरावे कसे त्या पार्‍याला?
 
सुर तुझे भुलवती या विश्वा,
नको आवरु तू पाव्याला!
 
किती वेगळा शांत किनारा,
खळू दे एखाद्या तार्‍याला
 
असो 'वेळ' ही युगानुयुगे,
कसे 'हो' म्हणू तव जाण्याला
 
नजीकपण हे समजेल कुणा?
नको नाव वेड्या नात्याला
 
-निलेश

रे जीवना...

वेडास माझ्या या अता कोणीच भाळत नाही,
सुक्या फुलास तसे कधी कोणीच माळत नाही

गेल्या ऋतूने जाळले घर, ती धरा भिजताना,
तो पावसाळा अजुन हा शेजार मोडत नाही

थेंबातुनी नित्य झिरपावे सागरी 'सल' माझे,
'ते' वाहते ती झींग या गगनात मावत नाही!

ते टाळणे तेव्हा तुझे, हेच तर सांगत होते