गझल

गझल

उ:शाप


स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शाप का?
पुण्यवंतांच्या जगी या पुण्य ठरते पाप का?

फूलवेड्या त्या गुलाबाचे जिणे काट्यांमध्ये,
गंधवेड्या चंदनाला वेढलेले साप का?

कोणते हे जीवघेणे दु:ख गासी कोकिळे?
भासती भेसूर रडणे हे तुझे आलाप का?

तू स्वतः स्वीकारली ही वंचना, ही बंधने,
व्यर्थ हा त्रागा कशाला? व्यर्थ हा संताप का

चार ओळी

===========
खरडल्या  चार  ओळी,
रखडल्या  फार  ओळी..

जिवाला  त्रास  झाला,
अता  सुचणार  ओळी

कसे  एकाग्र  होऊ?
मनावर  स्वार  ओळी

किती  त्वेषात  म्हटल्या
तिने  लाचार  ओळी

व्यथेची  वाफ  झाली..
बरसल्या  गार  ओळी

लिहूया  चल; जिथे  ना-
कुणी  पुसणार ओळी..!

 

 

-ज्ञानेश.
============

मैफल

जगणे माझे कसे, उमगले मला आज रे
क्षणाक्षणाचे मरणे करते हसुन साजरे

सुखमय आयुष्याचे फसवे देखावे ते
डामडौल तो पोकळ छळतो पुन्हा आज रे

भेसुर वास्तव कुरतडते या मुक्या मनाला
या दुखण्याला नाहि उतारा, ना इलाज रे

नुसती घुसमट, रडणे, कुढणे अन तडफडणे
अस्तित्वाची माझ्या वाटे मला लाज रे

गुन्हा

करार

माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते

श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते

वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते

वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली
काळोख पांगताना उघडेच दार होते

हातून सावलीचा निसटून हात

"वेदना"

खेळ !

...............
खेळ  !
...............


कुणाचा तरी भास झाला !
सुगंधी किती श्वास झाला !

अकस्मात जवळीक झाली...!
दुरावा अनायास झाला !!

खरे तेच खोटे निघाले...
अविश्वास विश्वास झाला !

कुणाचा तरी जीव  येथे...
कुणाचा तरी घास झाला !

बुडे कोण राजीखुषीने ?
किनाराच लंपास झाला !

तुलाही दिल्या वेदना मी

शाप

ढगांना ओढते कित्येकदा मी
उपाशी झोपते कित्येकदा मी

"नको हे रोजचे ओसाड जीणे"
मनाशी बोलते कित्येकदा मी!

कधी माझा तुला आधार होता
घराला सांगते कित्येकदा मी

कळाले दानशूरांचे इरादे,
वयाला झाकते कित्येकदा मी

कुठे माझ्यात त्याचा शाप आहे,
स्वतःला जाळते कित्येकदा मी

-निलेश

-निलेश

धाड....

उंच कोठे ताड मी...
वाकलेले झाड मी...

जेवतो मी भूक अन्
तो म्हणे खादाड मी...

कोंडले खोलीतही..
पुरवलेही लाड मी...

किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी...

काय संपत्ती तुझी..!
सांग टाकू धाड मी...?

मी                                                                                                                       "कर" असतो तर...

भाव


तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?

इथे काटेच आता सोबतीला,
[फुलांसाठी कधी हे गाव होते ]

तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायचे ते डाव होते

तुझ्या ओठांत माझे गीत होते,
तुझ्या गीतात माझे नाव होते

कधी सत्यात ते दिसलेच नाही
तुझ्या स्वप्नातले जे गाव होते

मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!

हे सुगंधाचे निघाले काफिले!

                 हे सुगंधाचे निघाले काफिले!
                मी असे हृदयात कोणा स्थापिले?

                रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
                ओळखीचे झाड कोठे राहिले?

                रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
                पण व्रताने, हाय! मजला शापिले!

                पाहुनी माझी भरारी आजची,
                का नभाने पंख माझे कापिले?