जाणीव वेदनांची ही सारखी कशाला ?
माझ्याच वैभवाला मी पारखी कशाला ?
माझे नसून राही माझ्याच अंतरी जे,
ते सौख्य साद घाली मज सारखी कशाला ?
गीतांत रंगले जे, चित्तात कोरले जे,
ते नाव आज येई माझ्या मुखी कशाला ?
त्या शांत सागराला वेढून वादळांनी
अस्वस्थ मी, तयाची झाले सखी