==========================
मनाशी पुन्हा प्रश्न आला जुना- 'कोण आहे तुझा मी'
मला तू तरी एकदा सांग ना, कोण आहे तुझा मी?
तुला मी कितीदा तरी बोललो कोण आहेस माझी
मलाही कळू दे तुझ्या भावना, कोण आहे तुझा मी!
तुला लाज माझ्यामुळे वाटते की तुला गर्व आहे?
तुझे व्यंग किंवा तुझा दागिना