......................................
...वजन एखादे नवे !
......................................
दुःख तू केलेस कोठे सहन एखादे नवे ?
सांग ना तुज का सुचावे कवन एखादे नवे ?
या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !
झिंग एखादी अशी की, जी कधी उतरू नये...
पाहिजे माझ्या मनाला व्यसन एखादे नवे