गझल

गझल

सोपे नसते

   

श्री. कुमार जावडेकर यांनी लिहिलेली 'सोपे नसते' हा रदीफ असलेली एक सुंदर गझल वाचण्यात आली होती. तोच रदीफ घेऊन मीही लिहिलेलं इथे देत आहे.

सोपे नसते

चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते
जळताना दरवळून जाणे सोपे नसते

सोपे नसते साध्याशा प्रश्नांचे उत्तर
मनातले नेमके सांगणे सोपे नसते

नकळत केव्हांतरी निसटतो

सुधारित "किनारा..."

तिला मी  भेटतो आहे पुन्हा... रोखा मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...

दिगंताहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..

दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मोका मला..

नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..

किनारा

कुर्निसात

सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी खालील 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
गझल मी स्वतः पेश करणार नसून तेथील स्थानिक कलाकार या रचनेचे सादरीकरण करतील.

आपल्या सर्वांच्याच शुभेच्छा या घटनेमागे होत्या, हा मला विश्वास आहे.
लोभ आहेच

किनारा....

तिला मी  भेटतो आहे पुन्हा... रोका मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...

क्षितीजाहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..

दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मौका मला..

नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..

किनारा

डायरी



तुला विसरायचे म्हणतो जरी
पुन्हा उघडे जुनी तो डायरी


तुला लखलाभ देव्हारा तुझा
मला सोडायची ना पायरी


सुळावरही न त्याला समजले
कुणाचा क्रूस हा खांद्यावरी


भिकारी मध्यरात्री ओरडे
'नका लपवू ढगांनो भाकरी'


पुन्हा तू चांदणे माळून ये
किती अंधारले आहे घरी


असा पाऊस नव्हता पाहिला
तुझ्या येती सरीवरती सरी


बरोबर

फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा.......



एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली



कळूनही त्या सरोवराचे  गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली



जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली



कुणा न दिसली  मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली



फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर

आयुष्य माझे


मृगजळाच्या व्यर्थ मागे, धावले आयुष्य माझे
आज कळले, कोरडे का भासले आयुष्य माझे


प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा
कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे


मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही
त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे


पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली
मी सुखाच्या दावणीला

तमाशा


एकटेपण मागता का?
अन स्वतःला टाळता का?


हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?


"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?


मार्ग चुकला! व्यर्थ आता
या दिव्याला राखता का?


जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?


यातना........

या... तना...
यातना...

का मना...?
कामना..!

साध.. ना..
साधना..

मोह ना..
मोहना....

जीव... ना..
जीवना...

जीवन


धापा टाकू लागे जीवन..
..श्वासांचे ॠण मागे जीवन


ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन


माझे चांगुलपणही सोडुन,
माझ्यासंगे वागे जीवन..


वरवरचे हे असते ले़खन
...हृदयी विणते धागे जीवन


मी कोणाच्या मागे नाही...
...माझे माझ्या मागे जीवन...


एक दिलासा पुरतो केवळ..
तितक्यानेही भागे जीवन

                                     - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर