गझल

गझल

जमले नाही....

शेवटचीही भेट घ्यायला जमले नाही.
तुझ्या घरी मज पुन्हा यायला जमले नाही.

कसे ओळखू सांग तुझे बोलके इशारे..?
इथे स्वतःला ओळखायला जमले नाही.

मला दिल्या तू उदास संध्या... भयाण रात्री...
तुझे दान हे परतवायला जमले नाही.

कधीच नाही बोललीस तू व्यथा मनातिल..
मलाही तुला समजवायला जमले नाही.

हजार आले मला

पाहिजे.....

गझलेमधे जरासे नावीन्य पाहिजे.
नावीन्य आणण्याचे प्रावीण्य पाहिजे.

चर्चा तिचीच व्हावी दाही दिशांमधे;
गझलेत प्रेयसीचे लावण्य पाहिजे.

येईल मोल साध्या टीकेसही तुझ्या;
आधी तुझ्यात तितके नैपुण्य पाहिजे.

वार्ध्यक्य लेखणीला येवू नये कधी;
चिरकाल बहरणारे तारूण्य पाहिजे.

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.

अमित वाघ.
"गुरूमंदिर", सुधीर कॉलनी,
अकोला: ४४४००१

स्वतंत्रता दिनाचे रुदन

भाषणबाजीने नटलेला देशभक्तीचा आव होता
बोलुन गेले अनेक आणखी खाजविण्याला वाव होता

विषय फालतू बोलत होते, मोठेपण ते सांगत होते..
समजत नव्हते मागे-पुढे आणखी कोणता डाव होता?

रक्त सांडले या भूमीवर वीरांना त्या वंदन करण्या..
जमला मेळा बाजारी आणि सांगत अपुला भाव होता

अपुला अपुला झेंडा रोवुन रक्त कोणते गेले सांडुन

यादगार

भांडून या मनाशी डोळ्यात धार येते
राहून राहुनी ही साली बहार येते

स्वप्नात जोर दावे झोपेमधे न मावे
सत्यात तीच इच्छा होऊन ठार येते

शब्दास नाव ठेवा "हा बोथटात मोडे'
काढून फेकलाकी त्यालाच धार येते

माझ्या मनास घाली मी सारख्याच घिरट्या
अंदाज ना तयाचे कोठून दार येते

जाहीर सांग येथे तंत्रास भेट

ही गझल आणि एक सांगाडा

आज माझ्या मनात आलो की
एक जोमात पार झालो की

 भेट घेईन माणसांचीही
मी जगातून या पळालोकी

कायदे पाळणे गुन्हा आहे
'कायदा हाच', जा अशा लोकी

बेवफाई तुझी न वाटावी
याचसाठी मरू म्हणालो की

मी तुला आवडेन खात्रीने
साजणी आणखी कळालो की

काय खोटे तुझे इरादे हे
होत डोळे तुझे

तुझी आठवण

धगधगणारा एक निखारा तुझी आठवण
कधी फूल तर कधी शहारा तुझी आठवण

कसे तरावे कुठे बुडावे समजत नाही...
कधी भोवरा कधी किनारा तुझी आठवण

पाचोळ्यागत दिशाहीन मी उडत राहतो..
शिशिरामधला सुसाट वारा तुझी आठवण

सर्व अर्थ शब्दांचे जेथे धूसर होती..
मौनामधला असा इशारा तुझी आठवण

मरेपर्यंत ह्या कैदेतुन सुटका नाही..
श्वासांवरती कडा पहारा तुझी आठवण

रूपेश देशमुख.
अकोला.४४४००१.
मों. नं. : ९९२३०७५७४३

खानाबदोष

होताच रात हृदया खानाबदोष करतो
मदिरा नसेल तेव्हा गझला सदोष करतो

आरशासमोर रचतो कवितेत दु:ख आणि
 आतून वाहवाचे बेभान घोष करतो

होतात भ्याड सारे शेपूट घालणारे
ज्यांना सलाम दिवसा येताच होष करतो

या साजरी कराया भन्नाट जिंदगी ही
दु:खात सांग कोणी का व्यक्त तोष करतो 

टीका करा कितीही पर्वा करू कशाला
त्यातून जीवनाचा

आहे हयात अजुनी

फुंकू नकोस शंखा खोट्या जयात अजुनी
निरखून बघ जरा मी आहे हयात अजुनी

जगतो जगा मी दुष्टा तू ठेवशी तसा पण
मरणाधिकार असती माझ्या कह्यात अजुनी

मज भेटण्यास देवा का वेळ मागशी तू
केव्हाही ये असे मी मद्यालयात अजुनी

का वानवा पडावी दुनियेत प्रेमिकांची
का मी कटाक्ष झेलू याही वयात अजुनी

गर्भात अंकुराला

द्वैत जन्मातले सरे बंधो...

हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो

काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो

देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो

कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो

एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....



रंग होतो सावळा

चंद्र आला तारकांचा घेउनी गोतावळा
सूर्य बावरला म्हणाला मावळा रे मावळा

लाजते केवळ, मी वेडा प्रेम आहे सांगतो
कोहळा काढून घेते देई साधा आवळा

या जगी मी काय रे पाहू नि कोणा पाहू मी
ती नजर हटवू कुठे देते  मी ठरतो बावळा

आपल्यांच्या साथीने परक्यासही सांभाळतो
कोण आहे चांगलेरे कोकीळा का कावळा

फार प्रगतीच्याच मागे धावता, कुणी पोरगा