गझल

गझल

...मारव्याचे सूर काही !

...................................................
...मारव्याचे सूर काही !
...................................................

लाभले काही़; तरीही हरवले भरपूर काही !
जवळ येतानाच गेले जे हवे ते दूर काही !

तू तुझ्या वकुबाप्रमाणे बोल जे बोलायचे ते....
येत नाही आणता उसना कधी मगदूर काही !

ओरडा कोणी कितीही - `आग नाही लागलेली`
- सांगतो हा भोवताली दाटलेला धूर

वाकडे

स्थापता तुम्हीच मूर्ती घालता तरी साकडे
माणसे आहात की बिन शेपटीची माकडे

ती विचारे का धडकशी रे मला मी बोललो
चाललो नाकापुढे पण नाक माझे वाकडे

की जरी व्यवसाय असला एक दोघांचा तरी
मन धुवावे कविकडे अन कापडे परटाकडे

यार हो बघताय ना झाली कशी माझी तर्‍हा
अर्थ ना गझलेत केवळ मोजतो मी आकडे

काय इतका राग दैवा

काळज्या

उरी काळज्या जेवढ्या माजल्या
कवी जाहलो आणि नावाजल्या


जरा लाभला तोष बघताच त्या
कशा मत्सरी काळज्या खाजल्या


मला भांडणे पाहण्याची मजा
जुन्या काळज्यांना नव्या पाजल्या


बने एकका काळजीची गझल
जगाला दिल्या केवढ्या गाजल्या

कधी बोलविता मी कुरवाळण्या
जुन्या धावल्या नवशिक्या लाजल्या


नका हाकलू  फार नाराजल्या
मनाआतुनी काळज्या वाजल्या


चिताही म्हणे हा जळावा कसा
धगी काळज्यांच्या मला भाजल्या


 


 

एक कविता

येशील काय माझी होऊन एक कविता ..
देईल स्वप्न सारी बांधून एक कविता

तोडीत वॄक्ष होता कोणी तिथे कलंदर ..
पण त्या मुळांस होती पकडून एक कविता

मी घातली जराशी समजूत चांदण्यांची;
तेंव्हा क्षणांत गेली चमकून एक कविता

जेंव्हा कुण्या कवीला ठेवील जग उपाशी,
खाईल तेथ अपुली तोडून एक कविता

विचारू नका रे

तिचे नाव कोणी विचारू नका रे
अशी लाजते की विचारू नका रे


असे प्रश्न साधे करी सादगीने
पुढे घेत वेणी विचारू नका रे


मला चांदणे भोवती रोज लाभे 
अशी हासते की विचारू नका रे


नशा, संकटे, हाल, घेऊन येई
तिची अंगडाई विचारू नका रे


मुलायम मुलायम कारणे सांगुनी
अशी भेट टाळी विचारू नका रे


 

ताठ

हा जो नदीकाठ आहे
तुटली इथे गाठ आहे


मी थांबणे तू न येणे
नियमीत परिपाठ आहे


समजूत तू घातलेली
पुरती मला पाठ आहे


तुझ्या यौवनाएवढा मी
नसलो तरी ताठ आहे

असे कोवळी सांज आणि
हृदयी व्यथा राठ आहे




 


 


 

शायरी का न यावी

 मती गुंग व्हावी निशा जागवावी
तुला पाहुनी शायरी का न यावी


संजीवनी ही विनामूल्य आहे
वेणी मृताला तुझी हुंगवावी


नहाशील तू हाच अंदाज आहे
उगा का नदीला अशी धार यावी


बहारीत जी वेल येण्यास टाळे
तिलाही तुझी पाउले चुंबवावी


जिथे शर्करेचा तुटवडा दिसावा
तुझी पालखी लाडके चालवावी


 


 


 

यापुढे

मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे

हे अर्थ-लेख, हे...चवदार आकडे!
ताटात हेच घ्या; वाढून यापुढे

"कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या..."
मी लाजवूच का... बोलून यापुढे?

मी दचकलो असा,  हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"

 बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...

गुण

रेशमी

चाललो ते मैल जादा की पुढे उरलेत ते
घ्यायला अंदाज डोळे काय आतुरलेत ते

का मला नरकातही जागा नसावी ना कळे
देव सांगे की तुझ्यावर सर्व कुरकुरलेत ते

केस डोळे रेशमी काया तुझी झळकावुनी
ऐक आम्हाला तयावर शब्द जे स्फुरलेत ते

नेमका तसलाच आला गंध या वार्‍यावरी
की निघाले बोचरे

मला येत नाही

तुला येतसे ते मला येत नाही
मला येतसे ते तुला येत नाही


उगी ना नटावे कधी कोंदणाने
तिचा दूरवर यार संकेत नाही


जया  वाटते आपली आपलीशी
पडे तोंड कळताच हाकेत नाही


अशी प्रेयसी आणली शोधुनी मी
खर्‍या आशयाला दगा देत नाही


तिचे वागणे हे तिचे रूप आहे
अलंकार अंती कुठे नेत नाही